My Royal Friend Ajij
अजिज हसन मुकरी : एक रॉयल माणूस आधी आताची गोष्ट सांगतो . मी नोकरीनिमित्ताने अडीच वर्षे बाहेरगावी होतो . त्या दिवसात अजिज हसन मुकरी हा माझा एकमेव मित्र होता जो मला दर चार पाच दिवसांनी फोन करीत होता . मुख्य गोष्ट आता सांगतो . अजिज हा जैतापुरचा माणूस आहे. लहानपणी कदाचित खलील काझी , शब्बीर काझी ह्यांच्याबरोबर जैतापूरच्या मातीत, मांडवी परिसरात आम्ही खेळलो असू . आता स्मरत नाही. त्याला आता सुमारे चाळीस वर्षे झाली . कदाचित हायस्कूलच्या जीवनात तो मला भेटला असावा . एक नक्की , रत्नागिरीच्या राम आळीत सुमारे वीस वर्षापूर्वी रॉयल मेडिकल स्टोअर्समध्ये अजिजची आणि माझी भेट झाली तेव्हा कळले की तो जैतापूरचा आहे. मग काय विचारता ! पूर्वी न स्मरणारी दोस्ती पुढे सुरु झाली . सर्व संदर्भ सांगणे इथे योग्य नाही . एकच सांगतो की त्या ...